सखे जेव्हा मी पावसात भिजतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो
तुझ्या आठवणींचा कळप मला कवटाळून टाकतो
अश्रूंना मग मी वाट मोकळी करून देतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो
सरिंवर सरी कोसळून पाऊस कहर करतो
लख्ख विजेच्या प्रकाशात भास मला तुझाच होतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो
टपटप थेंबांसोबत वाराही ताल धरतो
हवाहवासा तेव्हा मग तुझ्या पैंजणाचा आवाज वाटतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो
तू नसताना जवळी फक्त अंधार भासतो
पावसात आठवणींचा पाऊस मनात दाटतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो
कसा विसरू मी त्या गोड पावसातल्या आठवणी
हा श्वासही मला तुझाच भासतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो
ये परत फिरुनी माघारी नाही मजला तुझ्याविना कोणी
असंख्य पडणाऱ्या थेंबातही मी फक्त तुलाच शोधतो
सखे जेव्हा मी पावसात भिजतो

