सजलेली सकाळ
सजलेली सकाळ
दाट धुक्याने सजलेली सकाळ
हिरवाईने नटलेली सकाळ
सळसळणारि गवताची पाती
दवबिंदू भासे जणू टपोरे मोती
सुंदर त्या सकाळी बघ ना
आठवण तुझी ताजी झाली
हलकेच भावना हळवी झाली
सकाळ मनाला स्पर्शून गेली
डोंगराडून डोकावतो रवी
त्यावर काव्य रेखाटतो कवी
लेखणी कवीची कल्पनेत गुंतलि
सकाळ मनाला स्पर्शून तोवर
