सह्याद्री
सह्याद्री
सह्याद्रीचे पाणी झुळ झुळ
पडता कपारीतून होते निर्मळ
मनामधून झुरतो मरहट्ट हा
होते रचना अमृत प्रांजळ
मायबोली चे करता पूजन
स्त्रवते भाषा रांगडी ओजवळ
वागेश्वरीला करता आव्हान
पडती शब्द ओंजळ सोजवळ
शब्द अलंकार धरता वेठीस
साद देतो मायेने आईस
गाय हंबरते देखता पाडीस
फुटवा पान्हा निव्वळ मधाळ
तप्त तव्यावर फुटते लाह्या
शब्द बिलगती गाणी गाया
सप्तरंगाच्या इंद्र धनुवर
माय बरसते मधुर रसाळ
काव्य असावे अक्षर प्रांजळ
जसे वाजे बासुरी मंजुळ
जशी काय राधा नित्तल
लेणी घडावी सुंदर कातळ
संत महात्मे येथे रांधले
अभंग भारुड दिंड्या गायिले
ज्ञानियचा राजा होता मंगळ
भजनास त्याच्या होई वर्दळ
यौवना ची वाढता सळ सळ
नराधमाची होई कत्तल
हर हर महादेव नारा ऐकुनी
जागे होई बारा मावळ
माय भवानी अंबाबाई
सदा आशीर्वाद तीझा पाठीशी
तिच्या नावाने वाजवतो संभळ
सारस्वता चा घालतो गोंधळ
