STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy

3  

Tushar Chandrakant Mhatre

Tragedy

श्वास कोंडला

श्वास कोंडला

1 min
12K

त्यांनी मोकळा श्वास मागीतला,

तेव्हा ‘कठीण आहे!’ म्हणत तो हसला

त्यांनी हक्काची जागा मागीतली,

तेव्हा ‘बघतो नंतर’ म्हणत तो निघून गेला

त्यांनी अन्न मागीतलं,

तेव्हा ताट हिसकावून तो पळाला

त्यांनी जीवन मागीतलं,

तेव्हा ‘जगून काय करायचंय?’ म्हणत तो गेला

सर्वशक्तीमान समजत होता तो स्वत:ला, तो अखेर थांबला

जेव्हा वसुंधरेचा श्वासही कोंडला!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy