STORYMIRROR

Dhanraj Gamare

Tragedy Others

4  

Dhanraj Gamare

Tragedy Others

श्वास कोंडला जातोय भारतमातेचा.

श्वास कोंडला जातोय भारतमातेचा.

1 min
292

भ्रष्टाचारी मानव

सारा पैसा खातोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.

स्त्रीवर बलात्कार होताना

मानव फक्त पाहतोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.

जाती अन् धर्मावरून

भेदभाव होतोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.

निरपराध लोकांचा

जीव जातोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.

कर्जामुळे बळीराजा

आत्महत्या करतोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.

प्रदूषणामुळे लोकांचा

दम घुटतोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.

एवढे सगळे कृत्य

मानव करतोय ,

भारतमातेचा श्वास

कोंडला जातोय.


© धनराज संदेश गमरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy