शूरवीरांगणा
शूरवीरांगणा
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्या बाई! गेली किर्ती करुनिया भूमंडळाचे ठायी!धृ!
महाराज अहिल्यापूण्य प्राणी ! संपूर्ण स्ञियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी!!
दर्शने मोठ्या पापाची होईल हानी! झडतात रोग पापाचे पिता पाणी!!
उध्दार कुळाचा केला! पण आपला सिध्दीस नेला! महेश्वरास जो कुणी गेला!!
वर्णिती किर्ती गातात सतते गाणी! झाली दैवदशेती होळकरांची राणी !!
राहिला तेथे तो घेऊन बाप भाई!संसार चालवी दीन दुबळ्यांची आई!!
पर्वणी पाहून दान देतसे गाई!जपमाळ अखंडित हाती वर्णू काई!!
आली जरा झाली काही ज्याची विकलगाञे! पुरवावी त्यास औषधे वस्ञे पात्रे!!
जेविल्या सर्व मग आपण अन्नश खाई! रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई!!
