STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

3  

Abhilasha Deshpande

Others

आत्मकेंद्री

आत्मकेंद्री

1 min
483

कधी कधी होऊन जाव अस

आत्मकेंद्री बनावच थोड

निशब्ध डोळे मिटून जरा

सोडवावे विचारांच कोड! 1!

विचाराच्या कल्लोळात

आत्मकेंद्र हिंदळून सोडाव

योग्य अयोग्य न्यायनिवाडा

आत्मकेंद्रातच घडाव! 2!

कैक विचारांच्या राशी

फेर धरतात आत्मभानात

झुलवतात सुखदुःखाच्या

हिंदोळीवर खाली क्षणात! 3!

आत्मकेंद्री म्हणजे पायपुरत

पहाणे कदापीच नसते

चांगले वाईटाचा द्व्ंद विचार

चिंतन नी मनन असते! 4!

मिळतात प्रश्नांची उत्तरे

येथेच अगदी बिनचूक

आत्मकेंद्रात बसूनी मौन

शमते शांततेची भूक! 5!


Rate this content
Log in