STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

4  

Abhilasha Deshpande

Others

नारी

नारी

1 min
391

तू आई

तू ताई

तू आजी

तू बाईच शेवटी

तू आहेस नारी

तू वारस नाही घराण्याचा

पण वारस तूच देशील घराण्याला

स्त्री जन्म घेतलास अन् होळी जीवनाची केली

अग्नी परीक्षेला उगीच का सामोरी गेली

वर्तमानही त्यात जोडा

आताच तर भिषण चित्र आहे

महिला दिन साजरा करुन

त्याचे एक दिवस गोडवे गाऊन

बस काय...

विचारा एक क्षण

आपुल्याच मनाला

आई पायी स्वर्ग

असतो तिच्या

तिचे अन्यायकुणाला

सांगू कोणीही सुटले नाही

गरज आहे

मानसिकता बदलण्याची

दृष्टिकोन मानवीय ठेवाण्याची

तिला काही नको

फक्त जगु द्या फुलू द्या

कोवळ्या कळीला उमलू द्या

एक हात द्या, प्रेमाची साथ द्या

विश्वास द्या !


साहित्याला गुण द्या
लॉग इन