STORYMIRROR

Smeeta Bhimanwar

Inspirational

3  

Smeeta Bhimanwar

Inspirational

शूर शिवबा

शूर शिवबा

1 min
149

गड शिवनेरी धन्य जिजाऊ माऊली

पुत्र शिवबा घडविले संस्कारी

स्वराज्याची स्थापना करी मनोमनी

दिला नव स्वाभिमान पुत्र आकारी !१! 


युद्धनीती केले शूर शिवबा पारंगत

बालपणी शिकविले रणरणांगास

राम कृष्णा गोष्टीतून ज्ञान साकारले

गड किल्ले स्वराज्या जिंकण्यास !! २!! 


रयतेचा कर्मनिष्ठ जाणता राजा

सह्याद्रीच्या धर्म पारायण निखारा

निजामशाहीचा पळविले सैरावैरा

वाघ नखे खुपसली अफजल खाना !३! 


राज्य हिंदवी मराठ्यांचा वीरा

सह्याद्रीच्या छावा महाराष्ट्रा अभिमान

स्त्रियांवर नसे कधी राज्य अत्याचार

 ध्वज भगवाची राखली शिवबा शान !४! 


शूर पराक्रमी सर्वगुण संपन्न राजा

जन हितार्थ तत्पर कैवारी चंदन

धन्य भगवा शिवबा फडकविला 

स्वराज्याचे मानकरी शिवराया वंदन !५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational