STORYMIRROR

Smeeta Bhimanwar

Inspirational

4  

Smeeta Bhimanwar

Inspirational

भारतमाता

भारतमाता

1 min
180

वसुंधरा नटलेली निळ्या निसर्गाने

वेढलेल्या नद्यानी भारतमाता सुंदरतेने

सह्याद्रीच्या रांगेने मन खळखळणारे

आकाश नाद स्वर येई झणकणारे


भारतमाता हीच आमुची माय

आम्ही गाऊ तिचेच गुणगान

राष्ट्रध्वजाचा तिरंगा सदा लहरी

घेऊन भूमातेची विविधेतेची शान

   

तिरंगा ध्वज तीन रंगांचा

नेहमी राहो फडकत रुबाबात

तीन रंगांत संस्कार दिसतात

त्याग शांती पवित्र आत्मसात

   

सोनियाचा मांगल्यमयी दिन आजचा

माझ्या भारतमातेच्या स्वतंत्रतेचा

गीत गाऊ भारतमातेचे अभिमानाचे

देशप्रेम देशभक्ती दाखवू शौर्याचे


देशाचा बाळगा स्वाभिमान

नेहमी राखा अभिमान देशाची शान

शौर्याची गाथा जपून राखा मान 

लावा नारा भारत देश आहे महान


नभात उधळू चांदणे जयघोषाचे

तिरंगा गगनात फडके वंदन भारतमाते

माझे दोन्ही कर जोडुनी तुज सन्मानाने

नत मस्तक होतो भारतमाते आदराने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational