भारतमाता
भारतमाता


वसुंधरा नटलेली निळ्या निसर्गाने
वेढलेल्या नद्यांने भारतमाता सुंदरतेने
सहयाद्रिच्या रांगेने मन खळखळणारे
आकाश नाद स्वर येई झणकनारे
भारतमाता हीच आमुची माय
आम्ही गाऊ तिचेच गुणगान
राष्ट्राध्वजाचा तिरंगा सदा लहरी
घेऊन भूमातेची विविधेतेची शान
तिरंगा ध्वज तीन रंगांचा
नेहमी राहो फडकत रुबाबात
तीन रंगांत संस्कार दिसतात
त्याग शांती पवित्र आत्मसात
सोनियाचा मांगल्यमयी दिन आजचा
माझ्या भारतमातेचा स्वतंत्रतेचा
गीत गाऊ भारतमातेचे अभिमानाचे
देश प्रेम देश भक्ती दाखवू शौर्याचे
देशाचा बाळगा स्वाभिमान
नेहमी राखा अभिमान देशाची शान
शौर्या ची गाथा जपुन राखा मान
लावा नारा भारत देश आहे महान
नभात उधळू चांदणे जयघोषाचे
तिरंगा गगनात फडके वंदन भारतमाते
माझे दोन्ही कर जोडुनी तुज सन्मानाने
नतमस्तक होतो भारतमाते आदराने