STORYMIRROR

Smeeta Bhimanwar

Others

3  

Smeeta Bhimanwar

Others

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
187

ढग दाटले नभांगणी

 धरणीत जलधारा बरसली

*मृदगंध आसमंत पावसात*

सुगंधित सुवास पसरली! 


गडगडाहट ढगांचा अंधारून

वृक्षवेली ताल सुरात डोलती

विज कडकडती वाऱ्यासंगे

थेंब टपोरे वसुंधरात झरती! 


वर्षा ऋतुचा आगमनाने

धरा मखमली आनंदली

पाचू जडित शालू नेसला

पशु पक्षी वृक्ष वेली सजली! 


श्रावणात सरी बरसल्या नभी

सृष्टी चैतन्यात न्याहले

खेळ ऊन-पावसाचा दिसे

सप्तरंगी इंद्रधनुष्य प्रगटले! 


गंध फुलांचा अंतरंगी सडा

चाफा मोगरा गुलाब मनोमनी

मंद सुगंधित वास पसरला

निसर्गात नवचैतन्या चराचरी!!!!! 


Rate this content
Log in