STORYMIRROR

vaishali Deo

Inspirational

3  

vaishali Deo

Inspirational

शून्य

शून्य

1 min
202

कधी लुटावी मजा रितेपणाची

कधी ओढावा अंधार

कधी उतरवावी शाल मखमली

कधी पांघरावी घोंगडी रांगडी

कधी करावी वजाबाकी हिशेबात

नेहमीच करतो बेरीज मनात

खंत बाळगू नये कशाची

हळूच मांडावा सारीपाट

करू नये प्याद्याची पर्वा

खेळावे मन भरून

हार जीत यांची बाळगू नये तमा

सारेच स्वीकारावे हसून

खंत बाळगू नये कशाची

हेच असावे जीवनाचे गणित

बेरीज वजाबाकी करून

उरावे शून्यात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational