शर्यत
शर्यत
जीवनाच्या वनात!
माणसांच्या गावांत!!
कशी चुरशीची शर्यत हो!!
दिवस हो, की रात्र!
नुसती कामाची लगबग,
असते हो!!
पैशाचा नाद हा खोटा!
आरोग्याचा मान हा मोठा!!
हे कधी आपल्याला समजेल हो!!
माणुसकी हा धर्म असावा!
सोबत घेऊन विकास करावा!!
जिंकायचे तर मन ,जिंका हो!!
यश पूर्तीचा ध्यास असावा!
समाधानात सुख, हा मार्ग असावा!!
हेच जीवनाचे मर्म हो!!
