श्रमिका तुझ्याच साठी
श्रमिका तुझ्याच साठी


शेतात गाळूनी घाम
पोशिंदा पिकवी रान
ज्याच्यामुळे मिळे घास
त्या बळीराजाला सलाम
घाणीच्या साम्राज्यात उतरून
करी सफाई मन लावून
ज्यांच्यामुळे टिके आरोग्य
त्या सफाई कामगारास सलाम
चार घरची भांडी घासून
घर चालवे कंबर कसून
जिच्यामुळे मिळे उसंत
त्या दिव्य स्त्रीला सलाम
जनसुरक्षेचा ध्यास मनी
घेऊन उभा खाकी वर्दीत
ज्याच्यामुळे राहतो आम्ही निवांत
अशा पोलीस बांधवांना सलाम
सत्कार कष्टक-यांचा
जो मेहनत करून गाळे घाम
दिनरात त्या राबणाऱ्या हातांना
माझा शतशः प्रणाम