STORYMIRROR

Pavan Pawar

Abstract Tragedy Classics

3  

Pavan Pawar

Abstract Tragedy Classics

श्रम

श्रम

1 min
146

रक्ताचे घामात रूपांतर करून विकासाची शेती फुलविली,

साज कष्टाचा करून शृंगार मोत्याची मांडली

जाणीव होत आहे कष्टाच्या भाकरीच्या गंधाचा,

श्वास दरवळत आहे बळीराजाच्या

कष्टमय जीवनाचा


जमीन नव्हती पिकाची कष्टाने शेती केली उत्पनाची,

बिजाच्या उरातून शृंगार काढली सुवर्ण मोत्याची

रंग मातीचा मिळाला होता धरेच्या कृष्णाला,

नशिबात वनवास होता भुदेवीच्या रामाला


सोप नव्हतं जीवनाला आकार देऊन अस्तित्व देणे,

आधार नव्हता कुणाचा विश्वासाचे फुले उगवणे

लोखंडाच्या अवजाराला अभिषेक दिला रक्ताने,

शरीर झिजले बळीराजाचे शेतातील कष्टाने


रत्न अतिशय दुर्मिळ दिसतात सूर्याच्या किरणावर,

चांदण्याची झलक पडते पिकाच्या हिरव्या पात्यावर

गुलाबी थंडी तांडव करते नवजीवन देणाऱ्या स्वत्वावर,

नाव घडवितो लेक बापाच्या कष्टावर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract