STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics Inspirational

3  

Sanjana Kamat

Classics Inspirational

श्री हे स्वामी समर्थ

श्री हे स्वामी समर्थ

1 min
214

तोच ब्रम्हांड नायक,तोच भयभयहारक,

श्री स्वामी समर्थ प्रगटले कर्दळीवनात.

जगदोध्दारासाठी भक्त रक्षणा अवतार,

श्री गुरूदेव दत्तात्रेय प्रगटले वारुळात.


चराचरात राहत अक्कलकोटी विसावत,

जगा दाखवली वाट श्रेष्ठ नामस्मरणाची

श्रध्दा भक्तीची ज्योत तनमन,अंतर्यामीत,

सत्कर्मे व सदाचार गोड भाकरी कष्टाची.


जातीभेद, अंधश्रद्धेचा जाळत भवसागर,

वांझ म्हैस दूध देई, लीला ही दाखवित

मंत्रोच्चारता आले कोरड्या विहिरीस पाणी,

अनेक रूपं धरीत भक्त संकटात उध्दरीत


त्रैमूर्ती साक्षात नररूपे देव अवतार घेत,

अन्नदान, माणूसकीची महत्ती शिकवित.

दुःखी,कष्टी, रोगी व्याधीग्रस्तांच्या सेवेत,

आत्मपक्षी नश्वर,दिव्य शिल्पकार घडवित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics