STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

श्री गणेश

श्री गणेश

1 min
950

आला आला आला, गणपती आला

सुखानंद झाला, सकलांना (१)


गणेश चतुर्थी, आगमन झाले

नाचाया लागले, भक्तगण (२)


रुप गणेशाचे, अती मनोहर

तूच विघ्नहर, गणराया (३)


वदन साजिरे, तेज झळाळते

प्रभा झळकते, मुकुटात (४)


विद्या नि कलांचा, तूच अधिपती

तूच हरविसी, कार्तिकेया (५)


मोदक मधुर, प्रिय विनायका

आनंदाच्या कंदा, अधिदेवा (६)


श्रद्धा हो भक्तांची, पूर्ण मनोमनी

चिंता हरवूनी, कार्यसिद्धी (७)


करा संकल्पांची, सिद्धी गणराया

विनंती तुमच्या, चरणांसी (८)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract