STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

4  

Dilip Yashwant Jane

Inspirational

श्रावण

श्रावण

1 min
233

रिमझिम पाऊस हा

देई उल्हास मजला

शहारली ही धरणी

पहा श्रावण सजला


ओथंबून नभ आले

अवनीच्या रे भेटिला

श्रावणात असा सारा

घननिळा बरसला


शाल लेवून हिरवी

शृंगारली सारी भूई

तान्ह्या लेकराले जशी

स्तनपान करी आई


शेतामंधी तरारलं

पिक सारं नवतीचं

वाऱ्यासंगे फेर धरी

लेणं माथी सुंगधाचं


साऱ्या सृष्टीत अजब

मोद भरून उरला

खेळ उन सावलीचा

शेत शिवारी रंगला


इंद्रधनू सप्तरंगी

जसे तोरण आभाळी

स्वागतास श्रावणाच्या

प्रतिबिंब दिसे जळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational