STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

श्रावण...!

श्रावण...!

1 min
28.2K


श्रावण....!!!

श्रावण आला रे

श्रावण आला रे

ओला ओला ओला

श्रावण आला रे ....!


रिम झिम पाणी

पडे चहूकडे

भिजली ही राने

ती जोमाने .....!


कोवळे कोवळे

कधी ऊन पडे

अंगणी जणू ते

किरण सडे....!


ढग पळती झरा झरा

पहा वरती थोडे जरा

येईल पाऊस त्वरा करा

त्वरा करा...!


कोवळ्या चिंचा

घेती गाल गुच्चा

मित्र म्हणती बघ

मी सच्चा मी सच्चा...!


सण वारही मौजेचे

नागपंचमीचे झोपाळे हौसेचे

भाऊ सारे नवसाचे

दिवस हे सारे मस्तीचे...!


गार गारव्याचा मौज लुटा

सुट्टी साठी पळत सुटा

अभ्यासाचा नको रेटा

चला खेळू पटा पटा....!


श्रावण आला रे

श्रावण आला रे

ओला ओला ओला

श्रावण आला रे ....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational