श्रावण आला
श्रावण आला
श्रावण आला श्रावण आला
पाऊसधारा घेऊन आला...
थोडा लाजरा थोडा हासरा
मेघासंगे न्हाऊन आला..
रिमझिमणारा खळखळणारा
नदी नाले भरून आला...
गंधकेवडा मी मनकवडा
कानांमध्ये सांगून गेला...
तरुवेलीच्या वाटेनं रानाच्या
बांधावरती बहरून आला..
श्रावणाच्या रंगात रंगुनी
तळमळणारा प्रेमी आला...
श्रावण आला श्रावण आला
पाऊसधारा घेऊन आला...
