STORYMIRROR

Gajendra Dhavlapurikar

Classics

2  

Gajendra Dhavlapurikar

Classics

हाच माझा गुन्हा

हाच माझा गुन्हा

1 min
45

दुःख कुणाला कळेना

शब्द मलाही वळेना

कुणा सांगु शकलो मी

हाच माझा गुन्हा..हाच माझा गुन्हा..//धृ//


जाई जुईंच्या फुलांची

मनांत आरास मोठी

दानत पाहून तुमची

शब्द ब उरले ओठी

आरसा मनाचा खुलेना

शब्द मलाही वळेना 

कुणा सांगू ना शकलो मी

हाच माझा गुन्हा....//१//


अहोभाग्य असेल माझे 

तुमचा लाभो सहवास 

निरंतर डोईवर राहो 

आपल्या प्रीतीचा आशिष

नाती माझी फुलेंना

शब्द मलाही वळेना

कुणा सांगू ना शकलो मी

हाच माझा गुन्हा....//२//


अहंकार जळावा माझा

गर्व ही रिकामा व्हावा

जिकडे पहावे तिकडे

आपलाच जो तो दिसावा

क्रोध मनाचा जळेना

शब्द मलाही वळेना

कुणा सांगू ना शकलो मी

हाच माझा गुन्हा....//३//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics