हे भारत घटनाकारा
हे भारत घटनाकारा
हे भारत घटनाकारा तुम्ही लिहिले संविधान,
रंजल्या गांजल्यांना तुमचा नित्य अभिमान..!
हीन दीनांच्या हक्कासाठी लढलास जन्मभर,
बंदिस्त भिंती तोडुनी दिले करून मोकळे रान..!
जातीभेदाच्या पडत होत्या ठिणग्या ज्यावेळी,
राहिलास उभा एकटा ठेऊन देशहिताचे भान..!
मनुवाद्यांचा विद्रोह झुगारून ठरलास कर्दनकाळ,
गरिबांच्या हक्काची मनात जपली होती शान..!
भोंदू रूढी परंपरेला जर तुम्ही दिली नसती माती,
तर फडकत राहिले असते मनुवाद्यांचे निशाण..!
दुरून डोंगर होता साजरा हीन दिनांच्या माथी,
रूढी परंपरेत अडकून होती लोकशाही अजाण..!
तुम्हीच देवता हीन दिनाचे अन गोरगरिबांचे,
तुमच्यामुळेच मोकळा आमचा श्वास घेतो प्राण..!
