अत्तराची कुप्पी कुठली
अत्तराची कुप्पी कुठली
चंपा चमेली की जाई अबोली
आणायची कुप्पी कुठली,
अहो सांगा राया हो अहो बोला राया हो
अहो सांगा राया अहो बोला राया
मी अत्तराची कुप्पी कुठली ॥धृ॥
सुगंधी शयनाची आर्त श्वासांची
माझ्या मनात दरवळ भावनांची
अत्तर सुंगंधाने तुमच्या प्रेमाने
बहरून ही काया सजली
अहो सांगा राया हो अहो बोला राया हो
अहो सांगा राया अहो बोला राया
मी अत्तराची कुप्पी कुठली ॥१॥
गुलाब सुगंधाची मी आनंदाची
कुप्पी अत्तराची लाखमोलाची
घ्या समजून थोडे उमजून
मी यौवनाची आहे बिजली
अहो सांगा राया हो अहो बोला राया हो
अहो सांगा राया अहो बोला राया
मी अत्तराची कुप्पी कुठली ॥२॥
अत्तराचा फाया जरा ऐका राया
मोल पैशाचं हो न जावो वाया
घ्या ओढून जरासं बिलगून
तुमच्या कृपेने हि ज्वानी नटली
अहो सांगा राया हो अहो बोला राया हो
अहो सांगा राया अहो बोला राया
मी अत्तराची कुप्पी कुठली ॥३॥

