शोषण
शोषण
बेटी बचाव बेटी पढ़ाव
नारा दिले बेंबिच्या देठापासून
तरी ना बदलले चित्र
पेटली वासना वासनांध देहापासून
लहानागं छकुल बाळ ते
दया तव ना आली जीवाची
कुस्करली कळी मुळासकट
ममता माया जराही ना भरली उराशी
खेळतं बागडतं फुलपाखरु जणू
जाण नाही हो तिला कृत्याची
प्रेमाने घेतले जवळ तर जाते
निरागस लेकराला चाहुल ना तिला कुकर्माचि
बस्स झाले शोषण,
बंद करा माणुसकीचे दोहन
पुरुषार्थाचा करा आदर
करा आता तरी स्त्रीजातिचा जागर
