शोध
शोध
शोध घे स्वतःच्या मनाचा
आत असलेल्या प्रतिभेचा
शोध घे चांगल्या माणसांचा
संकटात मदत करणाऱ्यांचा
शोध घे आपल्या लोकांचा
निःस्वार्थपणे वागणाऱ्यांचा
शोध घे वाईट व्यसनाचा
प्रयत्न कर दूर राहण्याचा
शोध घे चांगल्या गोष्टीचा
गुलाम बनू नको सवयीचा
शोध घे सद्गुण सदाचाराचा
अंगीकार शुद्ध आचरणाचा
