शोध
शोध


श्रावण सर येऊन गेल्यावर
मातीला जो गंध सुटतो
तोच गंध मी शोधतो
तुझ्या रोमरोमात
सूर्याने पापणी मिटल्यावर
मावळतीला जो रंग चढतो
तोच रंग मी शोधतो
तुझ्या रंगहीन भाळावर
वसंत चाहूल लागल्यावर
कोकिळेला जो कंठ फुटतो
तोच स्वर मी शोधतो
तुझ्या मुक्या मुक्या ओठांवर
वैशाख वणवा पेटल्यावर
अंगाची जी लाही होते
तीच आग मी शोधतो
तुझ्या तप्त हृदयात