STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Inspirational

4  

shubham gawade Jadhav

Inspirational

शंभूराजे आणि मावळे

शंभूराजे आणि मावळे

1 min
450

तू होता राजकारणी मुरब्बी

तो २१ चा छावा

बघ औरंग्या तुला

झेपल का? शंभूचा गनिमी कावा


तुझी मनिषा होती

सगळं साम्राज्य जिंकण्याची

अरे एवढी कमजोर समजला होतास का?

कूस या सह्याद्रीची


तुझ्या हातावर तुऱ्या देऊन तुझ्या नाकाखालून सुटून

खेळ मांडला होता तुझ्या डावाचा

हा छावा होता त्याच

छत्रपती शिवजी राजांचा


सह्याद्रीच्या कुशीत राबतात

मनगट वीर शौर्याची

नाही घेत इथं कोणी सत्तेसाठी

जीव स्वतःच्या बाप जादा्यांची


तरसत होतास तू

एका एका विजयासाठी

स्वराज्याची भूक ठेऊन

मावळा लढत होता हिंदवी स्वराज्यासाठी


तू लढत राहिला स्वतःचं

साम्राज्य उभा करण्यासाठी

आमच्या एका एका मावळ्याने हसत हसत

जीव दिला हिंदवी स्वराज्यासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational