सहल
सहल


सहलीला जाऊ चला
गंमत तिथली पाहु जरा
निसर्ग देखावा पाहुन
होईल आनंद खराखुरा ॥१॥
दुपारी तिथल्या बागेत
अंगतपंगत बसली
जेवणाचा आस्वाद घेऊन
मने तृप्त झाली ॥२॥
बागेतील झुल्यावर
झोक्यांचा खेळ रंगला
उंच उंच झोका जाताना
जणू आभाळा भिडला ॥३॥
बागेतील रंगीबेरंगी फुले
मला खुणवू लागली
जवळ जाता हळुच
पाकळी मिटवू लागली॥४॥
बालपणाची माझी सहल
अशी छान छान झाली
तिच्याच सुंदर आठवणीत
मन मी रिझवू लागली॥५॥