श्रीमहालक्ष्मी
श्रीमहालक्ष्मी
1 min
104
आदिमाया आदिशक्ती
करवीर निवासिनी तू
पाठीशी भक्तांच्या सदैव
दुर्जनांचा संहार करिसी तू॥१॥
देवीची साडेतीन पीठे
त्यामध्ये तुला स्थान
तुझ्या दर्शनासाठी येती
थोर लहान सहान॥२॥
नवरात्रीत तुझा उत्सव
भक्त करिती उपवास
तुला आळविण्या आराधी
तुझ्या मंडपी करती आरास॥३॥
विष्णुपत्नी अंबाबाई
अनंत रुपे तुझी माऊली
दक्षिणकाशी तुझे तीर्थक्षेत्र
तू सार्या जगताची सावली॥४॥
करवीर क्षेत्री
भक्ती शक्तीचा डाव
शिवशक्तीचा मिलाप
भोळ्या भक्तांचा ठाव॥५॥