STORYMIRROR

dipali lokhande

Inspirational

4  

dipali lokhande

Inspirational

उगवला नव्या युगाचा सुर्य

उगवला नव्या युगाचा सुर्य

1 min
142

उगवला नव्या युगाचा सुर्य

नवीन आशा नवचेतना

देऊन गेला मजला

मोद झाला माझिया मना ॥१॥


उगवला नव्या युगाचा सुर्य

अंधःकारा मिटवुनी गेला

देऊनी सर्वांना प्रकाश

पेटवू ज्ञानाची ज्योत चला॥२॥


उगवला नव्या युगाचा सुर्य

तंत्रज्ञानाची कास धरुनी

सर्व झाले तंत्रस्नेही

संगणकाची मनी आस स्मरुणी॥३॥


उगवला नव्या युगाचा सुर्य

क्षितिजा पलीकडून

नभी लालिमा दिसे सुंदर

निसर्गाचे रुप दिसे छान ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational