नदी
नदी

1 min

33
नदी माझी माय
मायेची देते ऊब
माझ्यासाठी वाहत
येते लांबच लांब॥१॥
ना कधी तक्रार
देत राहणे काम
न घेण्याची आस
वाहते चारी धाम॥२॥
कधी वाहत राहते
कधी थांबून वाहते
संकटाला नाही घाबरत
वाट काढत पुढे जाते॥३॥
कडे कपारीतून जन्म
माझ्या मायीचा झाला
शुभ्र फेसाळ तिच्या लाटा
पाहून मजला हर्ष वाटला॥४॥
दुःख सोसून लेकराला
आनंद देते फार
तिच्या कुशीत मला
वाटते गारेगार॥५॥