STORYMIRROR

dipali lokhande

Others

3  

dipali lokhande

Others

भावभोळा हरी

भावभोळा हरी

1 min
46

पाऊले चालती

पंढरीच्या दारी

भावभोळा 

भक्तांचाच॥१॥


विठ्ठल नामाचा

जयघोष करी

माझा वारकरी

राऊळात॥२॥


विठ्ठला मंदिरी

पावन झाले

दर्शनाही आले

नगरीत॥३॥


आषाढीची वारी

करी सुखासाठी

तुळशीहार कंठी

घालुनिया॥४॥


आषाढी वारीचा

महिमाच भारी

माझा प्रिय हरी

पाहुनिया॥५॥


गाऊनी अभंग

मंदिरी गजर

करती जागर

सावळ्याचा॥६॥


देवाजीच्या दारी

रंगला अभंग

वाजतो मृदुंग

तालातही॥७॥


पायी वारी केली

तुझ्यासाठी हरी

कृपा माझ्यावरी

करिसी तु॥८॥


शोभे पितांबर

सावळ्या तनुला

वैयजंतीमाला

गळ्यामंदी॥९॥


माहेर पंढरी

मायबाप माझा

भक्त हा तुझा

आनंदला॥१०॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन