माझी आजी
माझी आजी
माझी प्रेमळ आजी
मी तिची सुंदरशी नात
रोज खायला करुन
घालते गोड भात॥१॥
माझी आजी रोज
गोष्ट सांगते मला
अंगाई गाऊन
झोपवते मजला॥२॥
आजीच्या बटव्यातून
औषधांचा भडीमार
चुटकीसरशी पळून
जातो माझा आजार॥३॥
आजी गावाला जाते
करमत नाही मला
आठवण येत राहते
नातीची फार तिला॥४॥
प्रार्थना करते देवाला
आजी सातजन्म मिळावी
तिच्याच कुशीत झोपून
प्रेमळ माया कळावी॥५॥