STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy

4  

Abasaheb Mhaske

Tragedy

शक्य झाल्यास ..

शक्य झाल्यास ..

1 min
253

भास तुझे नकोसे कधी हवेहवेसे

खट्याळ कधी लोभसवाणे

स्वप्नात तुझे येणे - जाणे अन

लाजून ते हासणे -हसून ते पाहणे


ध्यास तुझा अढळ ,निरंतर

श्वास जसा जगण्यास अनिवार

डोईवर भार जसा सदा नी कदा

सावली बनून सोबत करतेस का ?


तू म्हणजे सल अशी की

सांगताही येईना, सहनही होईना

आठवनीचा सागर, प्रेमाची घागर

जगण्याची आस जशी मरणाच्या दारावर


झाले - गेले विसरून जा शक्य झाल्यास

अश्रूंची फुले समाधीस्थळावर वाहून जा

गीत माझे तुजसाठीचे हवे तर गाऊन जा

दुःख , वेदना मात्र इथेच सारे ठेवून जा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy