STORYMIRROR

RADHIKA DESHPANDE

Inspirational

3  

RADHIKA DESHPANDE

Inspirational

सहजचं सुचले म्हणून..

सहजचं सुचले म्हणून..

1 min
12K

सहजचं सुचले म्हणून,

आज लिहावेसे वाटले।।धृ।।


खूप काही बोलायचे ते,

मनातचं राहिले,

ओठांवर असलेले बोल 

मनातचं दाटले...!।।१।।


आयुष्याच्या वळणावळणावर

कित्येकदा धुके दाटले,

तिमिराकडून तेजाकडे जाण्याचे

मार्गच बंद पडल्याचे वाटले।।२।।

सहजचं सुचले म्हणून....


यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करताना

कित्येकदा खाली कोसळले,

या काटेरी वाटेतून चालताना

पायही रक्तबंबाळलेले मला भासले।।३।।

सहजचं सुचले म्हणून....


डोळ्यांत असलेले ते,

यशप्राप्तीचे ध्येय मनात दृढ झाले,

कुठे तरी विझत आलेल्या अग्नीने,

पुन्हा पेट घेतल्याचे भासले।।४।।

सहजचं सुचले म्हणून....


वाटेत चालताना, धीर कधी ना डगमगला,

आता लढण्याचे, संघर्षाचे वारे अंगात भिनले,

कितीही संकटे आली तरी,

सामोरे जाण्याचे धाडस त्या क्षणी मी अनुभवले।।५।।

सहजचं सुचले म्हणून....


आस होती मनात नव दिवसाच्या उजाडण्याची 

ते स्वप्न आज सत्यात उतरले,

प्रकाशमय या सूर्यकिरणांनी

डोळ्यातील ध्येय पूर्णत्वास आणले।।६।।

सहजचं सूचले म्हणून आज लिहावेसे वाटले.....  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational