STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

शिवाजी महाराज

शिवाजी महाराज

1 min
199

ढोल ताशे वाजवत राजे

तुमची जयंती साजरी करू

राजे गनिमांच्या हल्ल्यात

जवान नाहक लागले मरू 

आतंकाने मांडला उच्छाद

पुढारी बोलबच्चनच राजे

देशभर उमटलेत पडसाद

तुमच्या नावे ढोलच वाजे

नेते राहिले नाही कामाचे

तुंबडीच भरण्यात ते गुंग

नाही देशसेवेचे व्रताचरण

मौजमजा करण्यात दंग

दुसऱ्यांसाठी झटण्याची

नाही राहिली राजे वृत्ती

घराच्या पिंजऱ्यात राहुन

मनं बनलीत अशी कोती

राजे तुम्हावाणी कुणाचे

पेटून उठत नाहीच रक्त

जगणे मरणे स्वत:पुरते

आनंद घेती स्वत: फक्त

साम दाम दंड नि भेद

वापरून झालीय नीती

कोडग्या जनाची बनली

अशीच जीवनाची रीती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational