शिवाई...
शिवाई...
ज्या विरांगणेला लागले ,
युद्धाचे डोहाळे ,
स्वराज्य स्थापन्या ,
सिंहावरी स्वार होऊनी,
रणागंणी दौडावे घोडे,
हाती घालावे विजयाचे तोडे ...
ती शुर पराक्रमी होती ,
शिवबाची आई ,
जिजाऊ म्हणतात तिला,
साक्षात उभी दूर्गा ,
जीने रचला स्वराज्याचा मेरू,
घडविला शिवबा ,
छत्रपती आपला ,
गरीबांचा राजा ,
आया बहिणीचा रक्षक ,
छाटून टाकले येऊ दया कुणी भक्षक...
ती आवडता शिक्षक,
स्वराज्य जीच्यामुळे ,
उभा दिमाखात ,
चंद्र सुर्य तारे संग ,
चमकु दे महाराष्ट्र भारत देश ,
तुम्हाला आण माऊलीची ,
घडवा शिवबा घराघरात ,
निदान शिकवा ऐवढेतरी ,
उभे रहा माया बहिणीच्या रक्षणार्थ ,
हिंदू धर्माची ही शिकवण ,
व्हावी ना विसरण ,
वंदन करा जिजाऊस ,
उभा जन्म त्यांचे उपकार हो ,,,
शिवाई झाली वंदनीय हो ...
जय भवानी जय शिवाजी ...
