STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Others

3  

Manisha Wandhare

Abstract Others

शिक्षणाच्या नावाखाली...

शिक्षणाच्या नावाखाली...

1 min
154

शिक्षणाच्या नावाखाली...

शिक्षणाच्या नावाखाली ,

दडपण किती ?

बुक वही पुस्तकांची ,

वाढतेय भीती ...

एक बालपण होते असे ,

चिंचा बोर मनसोक्त चोखे,

किती बांधले झाडाला झुले ,

इवले इवले खोडकर मुले ...

धावत सुटे पळवून आंबे ,

माळी दादा मागे पळे ,

जेव्हा सर येते धावून ,

जोरजोराने सरीला हाक देऊन ,

ये गं ये गं सरी गाता ,

आईच्या लपून अंगावर घेऊन ,

होई डोकं ओलंचिंब ,

मनही पाण्यात चिंब चिंब ...

डबक्यामध्ये उड्या घेते ,

कागदाची नाव पाण्यात सोडते ,

आई कान पकडून ओरडा देते ,

रडणे झाले तेवढ्याच पुरते ,

पुन्हा लाडोबांचे लाड करते...

आता कुठे ते निर्धास्त दिवस ,

सर्दी खोकला काढेल कस ,

सुट्टी पडता एक दिवस ,

गृहपाठ किती चिंतेचा कळस ...

इवल्या इवल्या स्वप्नांची माती ,

सोनेरी क्षण ते ना यांच्या हाती ,

यशस्वी होईल आजची पिढी ,

टेक्नॉलॉजी ची चढून सीडी ,

पण हरवली यांच्या हातून ,

ती स्वतंत्र घडी ...

हरवली यांच्या हातून,

ती स्वतंत्र घडी ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract