*शिक्षणाचा काय खेळ मांडला राव*
*शिक्षणाचा काय खेळ मांडला राव*
उन्हा-तान्हात फिरतात आमची कष्टाळू मुले
पण या पैश्याच्या बाजारात मुले जाणार काय आमची पुढे?
हृदयाचे मोल नाही तर जीवन आमचे मातीमोल झाले
करायचं काय ते बापाला आमच्या कळेनासे झाले
लक्ष साधूनिया धनुष्यातून शब्दांचा सोडला आम्ही बाण पुढे
कळणार काय सरकारला आमची अडचण आणि जाणार काय आमची मुले पुढे?
ज्यांनी मांडला खेळ पुस्तकांचा आणि केलंय शिक्षणाचा बाजार
जर शिक्षणाचे मोल असते तर का बरं आमची मुले पुढे नाही जाणार
सांगा हो, सांगा राव! कोण तुम्ही सांगा?
शिक्षक की ज्यांनी पैश्याचा खेळ मांडला कोण तुम्ही सांगा?
आम्ही हात मजुरी करणाऱ्या बापाची मुले
पण ज्ञान असून सुद्धा का बरं जात नाही आम्ही पुढे
का बरं नाही आमच्या स्वप्नांना वेग
खूप धरला विवेक आता द्या आम्हाला उत्तरांचा एक लेख.
खूप झालं मुलांनो,चला देऊ आता आपल्या आशांना वेग
पुस्तक हातात घेऊन प्रत्येक मुल ( गरीब व अमीर) लिहिणार त्यांच्या स्वप्नांचा लेख.
(ही कविता सर्व शिक्षकांना उपदेशून नाही लिहिण्यात आली आहे , तर ही कविता जे लोक मुलांचे ज्ञान बघून एडमिशन न देता डोनेशन घेऊन मुलांचे एडमिशन करतात त्यांना उपदेशुन लिहिण्यात आली आहे.*
*जर कोणत्याही शिक्षकाचे मन यामुळे दुखवल्या गेले असेल तर मी त्याची मनपूर्वक माफी मागते.)*
