शिक्षण हक्क
शिक्षण हक्क
कायदा आला शिक्षण हक्काचा,
विसर पडला अभ्यासाचा.
हस्तक्षेप वाढला पालकांचा,
दर्जा घसरला शिक्षणाचा.
म्हणे कशीही असो परिस्थिती,
ओळखायला शिका मनस्थिती.
जरी नसेल गेला कधीच शाळेत,
तरी द्यावा प्रवेश वरील इयत्तेत.
करु नका सजा असू द्या मजा,
विद्यार्थ्यालाच बनवा वर्गाचा राजा.
लिखाणाचं काय घेऊन बसलाय,
प्रात्यक्षिकावर वरच्या वर्गात गेलाय.
आता हतबल झालेत सारेच पालक,
म्हणू लागले शिक्षकच पाल्यांचे मालक.