STORYMIRROR

Dhanashri Budhabaware

Classics

4  

Dhanashri Budhabaware

Classics

शिक्षक

शिक्षक

1 min
198

आई जरी आपली पहिली शिक्षक असेल,

पण शिक्षक हा आपला दुसरा गुरू असतो 


शिक्षकाने जे शिकवले ते मी अभ्यासले,

 त्याने माझे भविष्य घडविले.

 

विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता शिकवणारे शिक्षक, 

आपल्या शुध्द मनाने समजून सांगणारे शिक्षक.


विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञान भरवणारे ते शिक्षक, 

मुलांना समृध्द बनवणारे ते शिक्षक. 


शिक्षण हा ज्ञानाचा दिवा असतो तर, 

शिक्षक हा ज्ञानाच्या दिव्यामधली वात असते.


आयुष्यात इतकं मोलाचं काम केलं ज्याने, 

ज्ञान मिळून दिलं सहजपणे. 


शिक्षकाचे कौतुक तोंडाने होत नाही, 

ज्ञानाचा दिवा वातीशिवय जळत नाही.


लेखणी हातात घेऊन ज्याने शिकवले, 

त्याने आमचे आयुष्य रंगविले.


कसे कौतुक करू त्याचे,

ज्याने आयुष्य दिले मोलाचे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics