शिक्षक
शिक्षक
ज्ञानदाता तू,विद्यादाता,
अंधाराचा प्रकाश तू,
कलाकुसरी तुझ्या अंगी,
विज्ञानाचे ज्ञान तू,
प्रिय तू आवडता तू,
तू माझा गुरु,
तू माझा शिक्षक.
समाजाचा निर्माता,
गणिते तुझ्या अंगी,
भाषेचा आकार तू,
भाषेचा उकार तू
तू माझा गुरु ,
तू माझा,शिक्षक.
नियमांचा आधार तू,
घडवीशी नागरिक,
नागरिकशास्त्र तू,
तू माझा गुरु ,
तू माझा,शिक्षक.
इतिहास तू,भूगोल तू,
शिकविशी पर्यावरण तू,
तू माझा गुरु,
तू माझा,शिक्षक.
डॉक्टरांचा डॉक्टर,
अभियंता चा अभियंता तू,
आधार तू ,स्तभंदिप तू,
देशाचा माझ्या,
प्रिय तू आवडता तू,
विद्यापीठ तू ,
तू माझा गुरु ,
तू माझा,शिक्षक.