शिक्षक मित्र
शिक्षक मित्र
लाभले मज भाग्य
मिळे शिक्षकरूपी मित्र
खडू फळ्याच्या साथीने
घडविले माझे चरित्र ||१||
केले अमूल्य असे
ज्ञान दानाचे काम
घडविले विद्यार्थी
कधी ने केला आराम ||२||
दिवस-रात्र कार्य केले
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी
प्रगतीपथावर शाब्बासकी
दिली विद्यार्थ्यांच्या पाठी ||३||
असे मनमिळावू शिक्षक
गेले काळाच्या पडद्याआड
कसा प्रवास करू तुमच्या विना
उघडतील का परत ज्ञानाची कवाड ||४||
आठवणींनी पाणावले डोळे
जगतो जीवन आठवणींच्या आधारे
तुमच्या अमूल्य आशिर्वादाविना
जीवन आमचे राहती अधुरे ||५||
