STORYMIRROR

Shekhar Chorghe

Romance Others

2  

Shekhar Chorghe

Romance Others

शीतल

शीतल

1 min
14K


माझं प्रेम 

शीतल या शब्दात व्यक्त होणारं, 

फक्त तीनच अक्षरांचा शब्द 

पण सारं प्रेम व्यक्त झालंय त्यात,

अश्रू देखील शीतल झालेत

महासागराचं रूप घेऊन, 

आभाळही शांत झालंय 

पावसाच्या कोसळण्यानं, 

चंद्र- चांदणी निजलेत 

हातात हात घेऊन 

जन्मोजन्मीच्या महाकाव्यासारखं,

आकाश डवरलय तांबूस रंगानं, 

पाऊस रिमझिम पडलाय 

या तप्त भूमीवर 

मंद सुगंध पसरलाय,

शीतल चांदण्यात 

सारं शीतल झालंय 

चांदण्यात तुला पाहून 

एक शेर आठवतोय

'उसको देखा तो 

मन में खयाल आया 

जिंदगी में इतना हसीन 

और क्या होगा'?

मला आठवतात 

गालिब, गुलाम, गुलजार 

आणि त्यांच्या गझला 

ज्या मला 

तुझं अस्तित्व जाणवून देतात 

माझ्या आसपास 

अन् मीही मग शांत होतो 

तुझ्यावरच्या कवितेत 

जशी तू आहेस 

शीतल...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance