STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

3  

Bharati Sawant

Romance

शीर्षक नाते - अतूट बंधन

शीर्षक नाते - अतूट बंधन

1 min
1.5K


आजीआजोबा आईबाबा

जीवनातली ही रक्ताची नाती

अतूट बंधनाची ही नातीगोती

अमूल्य असते त्यांतील प्रीती


आत्या काका मामा मावशी

यां नात्यातली स्नेहार्द्रता

नि मित्र मैत्रिणी सखे संबंधी

जोडलेल्या नात्यातली माधुर्यता


नाती आंबट गोड कडू तिखटही

जपावी लागतात कोमल फुलांसारखी

एकमेकांवर अर्पावे तन मन सर्वस्व

नाहीतर होतील ती प्रेमाला पारखी


पती पत्नी नात्यात आहे अतूट बंधन

असावे त्यात प्रेममर्यादांचे रिंगण

रुसवे फुगवे भांडण कलागती

साऱ्यांवर व्हावे प्रेमाने शिंपण


वात्सल्याच्या हळुवार धाग्यांमध्ये

मायलेकरांचे नाते असते नाजूक

जोडते स्नेहभाव नि ऋणानुबंध

जसे गरम पोळीवरचे तूप साजूक


अतूट बंधनाची ही घट्ट नाती

जोपासावी हरेकाने हृदयात

प्रेमगंध उधळून द्यावा सारा

जशी साखर विरघळते दुधांत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance