STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शीर्षक धाव धाव अंबाबाई

शीर्षक धाव धाव अंबाबाई

1 min
236

धाव धाव अंबाबाई

धाव आता झडकरी

वेध घ्यावा कोरोनाचा

विनविते गं मी आई   (1)


किती निष्पाप जीवांचे

बळी ह्याने घेतलेसे

झाली कुटुंबे उजाड

वध करी सत्वरसे     (2)


दुष्ट संहारक दुर्गा

दानवांचा केला वध

आता ह्याचि आसुराचा

त्रिशूळाने करी वध    (3)


माया तुझी अपारचि

पावतेस तू भक्तांसी

अष्टमीस सत्वरचि

मार ह्याचि कोरोनासी   (4)


तुझी कृपा आम्हां लाभो

आशिर्वच अखंडचि

सुखानंद सर्वां लाभो

दुर्गा भक्त तारकचि    (5)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract