शहीद
शहीद
काळ्या मातीचा तू श्वास
जगण्या तुझा आधार
जिवाचा तू पाठीराखा
किती सोसशील भार ||१||
या धरणीचा सुपुत्र
सीमेवरी तुझे गाव
देशभक्तीच्या शाईने
कोरे छातीवरी नाव ||२||
हृदय भरूनी येते
आक्रोश करती माय
हंबरुन विचारती
पहा गोठ्यातील गाय ||३||
शवपेटीतुन येई
तिरंग्यातुन जवान
अश्रु ओघळी नयनी
म्हणती जय जवान ||४||
वीर मरण लाभले
या देशाच्या लेकराला
अश्रूंचा पाऊस येतो
भेटण्या या शहीदाला ||५||
