शेवटी नशीब
शेवटी नशीब
प्रारब्ध कधी बदलता येत नाही
तस नशिबाचे भोग भोगल्याशिवाय जाता येत नाही।
खंबीर मनान फुफाट्यातुन ऊठाव लागत
तरच उंच आकाशी भरारी घेता येत।
नशिबाच ठाव लागणार कधी याच तंत्र नाही जगात
मंत्र काय करणार शेवटी नशिबच भाळी कर्मात।
योग म्हणाव की योगायोग कोनावर ठेवावा विश्वास
फक्त शोधतो आहे जीवनाचा चालणारा श्वाच्छोश्वास।
चुक की अचुक कस सांगु जगाला
माफी मागतोय माझीच मी समजवतोय मनाला।
नशिबान पांग फेडलेत त्याच्या हिशोबाने
मी जगतोय देवाच्या आणि कर्माच्या भरवसाने।
