ऐकला
ऐकला
जीवन अस जगा की जगाला तुमचा हेवा वाटे।
खर काय नी खोट काय त्यात ही हसु वाटे॥
समजल ना कोण कोनासाठी नसत मग काय ?
ऐकला चला रे हा नारा खुप मोठा हाय?
जीवनात स्वावलंबी बना कुबड्या काय कामाच्या।
सार गावं मामाचं पण कोण नाय कोणाच॥
लय वाटत कोणतरी असाव जीवाभावाच ।
पण मन म्हणत शेवटी कोण नाय कोनाच॥
ज्याच्यासाठी जगायच तेच नाय आपल।
मग का करायच तुपल मापल॥
शेवटी जगात साथ लागतीच अग म्हणायला।
ऐकला नाय रे मी शेवटी देव हाय ना सावरायला॥
